esakal | सोमय्या यांना केंद्र सरकारने नियुक्त केले आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सोमय्या यांना केंद्र सरकारने नियुक्त केले आहे का?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरूड : महाराष्ट्रातील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे माजी खासदार किरीट सोमय्या बाहेर काढत आहेत. योग्य कागदपत्रे हातात लागल्यावर ते प्रसारमाध्यमांसमोर येतात. मात्र, प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्या प्रकरणाचे पुढे काय झाले किंवा भ्रष्टाचार सिद्ध झाला का, ही माहिती देत नाहीत.

हेही वाचा: मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या फर्निचरला भ्रष्टाचाराची वाळवी, भाजपचा दावा...

त्यामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना नियुक्त केले आहे काय, असा प्रश्न असून भाजपने या प्रश्नाचे जाहीर उत्तर द्यावे, अशी मागणी करत माजी आमदार डी. एन. चौलकर यांनी सोमय्या यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात कोणताही नेता प्रबळ होत असेल, तर त्याच्यामागे ईडीची चौकशी लावली जाते. भाजपमध्ये कोणी भ्रष्टाचार करीत नाही का, असा प्रश्न चौलकर यांनी उपस्थित केला. सोमय्या यांनी मागील पाच वर्षांत किती भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली, त्या प्रकरणांमधून निष्कर्ष काय निघाला, याची माहितीसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना द्यावी, भ्रष्टाचाराची प्रकरणे काढल्यावर आठ ते दहा दिवस ते माध्यमांसमोर येतात, नंतर ते शांत का बसतात, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली

loading image
go to top