esakal | चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांना दिलेल्या धमकीवर हसन मुश्रीफ म्हणाले....

बोलून बातमी शोधा

hasan mushrif  comment on NRC act
चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांना दिलेल्या धमकीवर हसन मुश्रीफ म्हणाले....
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री मागे लागले होते. त्या खडतर परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. म्हणून छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया दिली. वास्तविक चंद्रकांत पाटील यांना राग येण्याची आवश्यकता नव्हती" असे हसन मुश्रीफ म्हणाले. ते राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. (hasan mushrif reaction on chandrakant patil threaten to chhagan bhujbal)

"चंद्राकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकावले. तुम्ही जामिनावर बाहेर आहात, निर्दोष सुटलेला नाहीत. तुमचा जामीन रद्द करु अशा पद्धतीची भाषा वापरली. आज ईडी, सीबीआय, एनआयए आणि कोर्ट खिशात असल्यासारखी भाजापची भाषा आहे. चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांची तात्काळ माफी मागावी" अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

हेही वाचा: 45 वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण; घेता येणार कोविडचा दुसरा डोस

"मुकेश अंबानींच्या घरासोमर स्फोटके ठेवणारा मास्टर माइंड कोण? ते अद्याप NIA ने जाहीर केलेले नाही. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर चौकशी होते. मग आता त्यांच्यावर आरोप होत असताना चौकशी का होत नाही?. परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला या दोघांची चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली.

हेही वाचा: उद्घाटनाआधीच दादरमध्ये ड्राइव्ह इन लसीकरणासाठी मोठी गर्दी

"भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हे सरकार टिकून राहील. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत. २५ वर्ष महाविकास आघाडी टिकून राहील असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. पंढरपुरचा निकाल आम्ही स्वीकारला, आम्ही हरलो. गोकुळचा आज निकाल असून तिथे आमचा विजय होईल" असा दावा मुश्रीफ यांनी केला.