पनवेलमध्ये अजूनही खुलेआम सुरु आहे 'मृत्यू'ची विक्री....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

पनवेल पालिका हद्दीत मांगुर माशाची खुलेआम विक्री. कारवाई कोण करणार, नागरिकांचा प्रश्न

नवी मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मांगुर माशाच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. मात्र तरीही मृत्यूचे आमंत्रण देणारा, जीवघेणा मांगुर मासा पनवेल पालिका हद्दीत सर्रास विकला जातोय. पालिका आणि अन्न आणि औषध विभागाकडे कारवाईचे अधिकार नाहीत, अलिबागमधील मत्स्यव्यवसाय विभागाचा संपर्क होत नाही. त्यामुळे आता याबाबत कारवाई कोण करणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

मांगुर माशापासून कॅन्सर, डायबिटीजसारख्या भीषण रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे मांगुर माशावर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही पनवेल पालिका हद्दीतील खारघर, ओवे, तळोजा, कामोठे, पनवेल आदी भागातील मासळी मार्केटमध्ये खुलेआम मांगुर माशाची विक्री केली जात आहे. पालिका आणि पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून जीवघेण्या मांगुरची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

मुंबई येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त कार्यालयात विचारणा केली असता 02141-222037 या अलिबाग येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयात चौकशी करावी असं  सांगितलं गेलं सदर क्रमांकावर संपर्क केला असता हा नंबर बंद असल्याचे आढळून आले.

खारघर मासळी मार्केटमधील मांगुर मासे विक्रीसंदर्भात तक्रारीसाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयात विचारणा केली असता. कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला नसून अन्न व औषध विभागाकडे तक्रार करावी असं सांगण्यात आल्याचं मनसे पदाधिकारी  चिंतामण पाटील यांनी म्हटलंय. 

मोठी बातमी - 'तो' म्हणाला हे काय किती पिंपल्स? तुझ्यापेक्षा तर मेहुणी सुंदर, एवढ्यावरूनच तिनं...

त्यामुळे आता पालिकेकडून, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाईचे कोणतेही आदेश नसल्याने आणि अलिबाग मत्स्यव्यवसाय विभागाचा दूरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा प्रसन्न आता निर्माण झालाय. 

hazardous magur fish is openly sold in navi mumbais panvel area and nearby places


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hazardous magur fish is openly sold in navi mumbais panvel area and nearby places