

Mumbai KEM Hospital
ESakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील रुग्णसेवेतील त्रुटींची मध्यरात्री प्रत्यक्ष पाहणी करत आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिगें यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रात्री १२ वाजता अचानक भेट दिल्यानंतर रुग्णांच्या उपचारात होणारा विलंब, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रुग्णांच्या नातेवाइकांशी तसेच लोकप्रतिनिधींशी होत असलेल्या संवादातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.