esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत 'हे' आदेश, म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत 'हे' आदेश, म्हणालेत...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत 'हे' आदेश, म्हणालेत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सतत लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज उद्धव ठाकरे यांनीही याबाबत राज्याच्या जनतेला संबोधित केलं. आता राज ठाकरे यांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी मनसैनिकांना ७ महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. यात जनतेला योग्य ती मदत करण्याचं आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलंय. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मनसैनिकांना ७ टिप्स दिल्या आहेत. तसंच, "कोरोनाचा फैलाव होऊ न देण्यात आपण यशस्वी झालो आहोत अजून दोन आठवडे हे पथ्य पाळलं तर आपण कोरोना रोखण्यात यशस्वी होऊ", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. जनतेला  एकमेकांच्या संपर्कात न येण्याचं, गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: गो कोरोना गो साठी थाई मसाजचा पर्याय; लोकांच्या भीतीचं 'असं'ही भांडवल.. 

राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी ७ टिप्स:

  • आपण ज्या भागात राहतो  तिथे लोकं कोरोनाबाबत गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. त्यांना दिलासा द्या. त्यांना योग्य ती माहिती पुरवा. सोयींची कमतरता असेल तर योग्य ते सहकार्य करा.
  • मनसेच्या शाखांमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयांमध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तक्रारी घेऊन येणाऱ्यांना वेळ देऊन बोलवा आणि गर्दी आटोक्यात आणा. कुणाशीही संवाद साधताना तीन फुटांचं अंतर ठेवा. 
  • आपल्या भागात जर कोणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगा. त्यासाठी त्यांना कुठलीही जबरदस्ती करू नका. त्यांना तपासणी करण्याचं महत्व समजवून सांगा. त्यांना आपल्या भागात असलेल्या आरोग्य खात्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी भेट घालून द्या.

हेही वाचा: मुंबईत आणि उल्हासनगरमध्ये आणखी एक-एक कोरोना रुग्ण;महाराष्ट्राची आकडेवारी गेली ४९ वर.. 

  • आपल्या भागात असे रुग्ण आढळले तर प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या देखरेखीखाली रुग्णांचे उपचार करा. आरोग्य खात्याला सहकार्य करा त्यांच्याशी संघर्ष करू नका ही मनसेची भूमिका आहे
  • आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असेल तर तशी माहिती आरोग्य यंत्रणेला द्या. दुकानांमध्ये योग्य ते सामान आहे की नाही तपासा. कोणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्या आणि काळाबाजार होणार नाही याकडे लक्ष ठेवा.
  • ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील तर अशा लोकांना शोधून त्यांची खाण्याची सोय करा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग आणि इतर रूग्ण असतील तर त्यांना मदत करा. 

हेही वाचा: "भोंगा वाजलाय,वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु"-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

  • महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकून घ्या. महिला काही बोलत नाहीत म्हणून त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांना योग्य ती मदत करा. 

MNS head raj thackeray gives 7 tips to MNS social workers to amid corona virus

loading image