esakal | कौतुकास्पद! भाटिया रुग्णालयातील तब्बल 'इतक्या ' कोरोनामुक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान..
sakal

बोलून बातमी शोधा

bhatia hospital

कोविड उपचारांवर प्रभावी ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीला सामान्य कोरोनामुक्त रूग्णांकडून जरी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी जे डाॅक्टर्स कोरोनावर उपचार करत आहेत त्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेतला आहे. 

कौतुकास्पद! भाटिया रुग्णालयातील तब्बल 'इतक्या ' कोरोनामुक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान..

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोविड उपचारांवर प्रभावी ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीला सामान्य कोरोनामुक्त रूग्णांकडून जरी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी जे डाॅक्टर्स कोरोनावर उपचार करत आहेत त्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेतला आहे. 

खासगी रुग्णालयातील डाॅक्टरही प्लाझ्मा दान करायला पुढे येत आहेत. कोविड 19 आजाराने ग्रस्त तसेच चिंताजनक प्रकृती झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी भाटिया रुग्णालयातील 17 डॉक्टर्स, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचारी पुढे सरसावले आहेत. 

हेही वाचा: अरे वाह! मुंबईच्या 'या' ठिकाणाला मिळणार अटलबिहारी वाजपेयींचं नाव; उर्वरित विस्तारही होणार वेगात
 
हे सर्व युद्ध पातळीवरील कर्मचारी कोविड-19 आजारातून बरे झालेले आहेत. हे सर्वजण कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भाटिया रुग्णालयात विलगीकरणात होते आणि त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. आता या ही उपक्रमात सहभागी होत कोविड-19 आजारातून बरे झालेल्या इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. 

400 रुग्ण कोरोनामुक्त:

कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्यापासून भाटिया रुग्णालयाने 400 हून अधिक कोविड 19 रुग्णांना यशस्वीरित्या बरे करण्यात भूमिका बजावली आहे. 

“ या साथीने आरोग्य कर्मचा-यांची शारीरिक, मानसिक परिक्षा घेतली. तरीही, रुग्णालयातील कर्मचारी नि:स्वार्थपणे स्वयंस्फुर्तीने रक्तदान करण्यासाठी पुढे आले आहेत. यामुळे गंभीररित्या आजारी असलेल्या कोविड रुग्णांना बरे करण्यात खूप मोठी मदत होणार आहे. त्यांच्यामुळे ब-या झालेल्या आणखी रुग्णांनाही पुढे येऊन रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल," असे भाटिया रुग्णालयाचे  वैद्यकीय संचालक डॉ. आर. बी. दस्तुर यांनी सांगितलंय. 

 काय आहे प्लाझ्मा थेरपी ?

कॉन्व्हालेसंट प्लाझ्मा थेरपी (सीपीटी) ही दात्याच्या शरीरातील अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) निष्क्रियपणे रुग्णाच्या शरीरात सोडण्याची (ट्रान्सफ्युजन) जुनी पद्धती आहे. यापूर्वीही अनेक संसर्गजन्य आजारांसाठी ही पद्धती वापरली गेली आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या मर्यादांपर्यंत यशस्वी ठरली आहे. आजारातून ब-या झालेल्या रुग्णांच्या शरीरातून घेतलेल्या प्लाझ्मामध्ये काही (न्युट्रलायझिंग) अँटिबॉडीज असतात आणि त्यामुळे शरीरातील विषाणूला निष्क्रिय करण्यात मदत होते आणि ती व्यक्ती आजारातून पटकन बरी होते. 

हेही वाचा: "चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) भारतभरात बहुकेंद्री चाचण्या घेत आहे आणि त्याचे निकाल अद्याप प्रतिक्षित आहेत. दुस-या टप्प्यात म्हणजेच ओपन-लेबल रॅण्डमाइझ्ड कंट्रोल्ड “प्लासिड ट्रायल”मध्ये सौम्य स्वरूपातील कोविड-19 आजाराशी संबंधित जटीलतेवर नियंत्रण रोखण्याबाबतची सीपीटीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यांचे मूल्यमापन केले जात आहे. यासाठी 452 रुग्णांनी नावे नोंदवली आहेत.

संपादन : अथर्व महांकाळ 

health workers in bhatia hospital have donated their plasma