esakal | वैद्यकीय कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, नाहीतर होईल 'ही' कारवाई...
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, नाहीतर होईल 'ही' कारवाई...

कोरोना व्हायरसचा फैलाव सर्वत्र पसरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केला

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, नाहीतर होईल 'ही' कारवाई...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा फैलाव सर्वत्र पसरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनच्या काळात अनेक सेवा बंद करण्यात आल्या. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी केवळ कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. दरम्यान अशातच पालिका प्रशासनाने रुग्णालयामधील जे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी 23 मार्चपासून कर्तव्यावर हजर राहिले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना तातडीने उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र निर्देश देऊनही ज्या वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली नाही, अशांना पुन्हा एकदा 72 तासांची नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जर का नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलंय. यासंबंधित पालिका प्रशासनानकडून पुन्हा एकदा निर्देश जारी करण्यात आलेत. 

कोरोनाविरोधात महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयामधील अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर राहिलेले नाहीत. नोटीस बजावल्यानंतर 72 तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही संबंधित कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी कर्तव्यावर उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना अनुपस्थिती संदर्भात खुलासा योग्य कारणासह वेळीच सादर करावा लागणार आहे. 

मोठी बातमी - भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींशी निगडित मानवी हक्क रक्षकांवर स्पिअर फिशिंगच्या माध्यमातून ठेवली जात होती नजर..

तसंच पालिकेच्या वैद्यकीय परीक्षकांकडून शारीरिक स्वास्थ्य प्रमाणपत्र (Physical health certificate) घेणे गरजेचे असेल तर या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्याचे अधिकार खाते प्रमुख, सहायक आयुक्त यांना आहेत. वैद्यकीय परीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी कोविडशी संलग्न कामामध्ये व्यग्र असतील तर ड्युटीवर उपस्थित होऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वयंघोषणापत्रामध्ये आजारी असल्याचा उल्लेख केला नसेल तर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात येऊ नये, असे निर्देश पालिकेने दिले आहेत. मात्र स्वयंघोषणापत्रामध्ये उल्लेख केलेली बाब खोटी आढळून आली तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय परीक्षणास न पाठवण्याची सूट ही 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

मोठी बातमी -  'आता चीनला लाल आँखे दाखवा'; मंत्री जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रीया

55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सूट

वय वर्षे 55 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले सर्व कर्मचारी, अधिकारी यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस असे दीर्घ स्वरूपाचे आजार असतील. तसंच दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांचीही रोगप्रतिकारशक्ती सामान्यांच्या तुलनेमध्ये चांगली नसेल तर त्यांना कामावर हजर राहण्यापासून पालिकेन सूट दिली आहे. पालिका प्रशासनाकडून असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

health workers who are not attending hospitals will face music read full news 


 

loading image