esakal | 'आता चीनला लाल आँखे दाखवा'; मंत्री जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रीया
sakal

बोलून बातमी शोधा

'आता चीनला लाल आँखे दाखवा'; मंत्री जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रीया

संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर बसणं पुरे झालं. आता चीनला लाल आँखे दाखवा, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

'आता चीनला लाल आँखे दाखवा'; मंत्री जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रीया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गलवाण खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आलं. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर बसणं पुरे झालं. आता चीनला लाल आँखे दाखवा, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन शिथील झालं रे झालं; मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं! वाचा बातमी

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा संताप व्यक्त केला आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे "लाल आंखे" करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. 

आव्हाड यांनी यापूर्वीही चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीवरून मोदी सरकारला डिवचले होते. पाकिस्तानला आपण धडा शिकवतो, मग चीनला का नाही? असा सवालही त्यांनी मोदी सरकारला केला होता.

संजय राऊत यांचे मोदी सरकाराला थेट सवाल

संजय राऊत यांनी एकापाठोपाठ दोन ट्वीट करून चीन प्रकरणावर बोलण्याची विनंती केली आहे. तसंच ट्विटमध्ये त्यांनी मोदींना थेट सवाल उपस्थित केलेत. 

पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल. संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? काहीतरी बोला, अशी विचारणा केली आहे. 

चीनच्या या मुजोरीला भारत कधी सडेतोड उत्तर देणार आहे? बिना गोळीबार केल्या आपले 20 जवान शहीद झाले आहे. आपण असं काय केलं आहे? चीनचे किती जवान मारले गेले आहे ? असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.

4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?

चीन हा आपल्याच भूमीवर पाय रोवून उभा आहे. त्याने खरंच घुसखोरी केली आहे का? पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य परिस्थिती काय आहे? बोला, काहीतरी बोला. काही तरी सांगा. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. जय हिंद!” अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.