भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींशी निगडित मानवी हक्क रक्षकांवर स्पिअर फिशिंगच्या माध्यमातून ठेवली जात होती नजर..

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींशी निगडित मानवी हक्क रक्षकांवर स्पिअर फिशिंगच्या माध्यमातून ठेवली जात होती नजर..

मुंबई : अम्नेस्टी इंटरनॅशनलने कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील सिटिझन लॅबच्या सहयोगाने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. हा अहवाल थेट कोरेगाव भीमा हिंसाचार  प्रकरणाशी निगडित कार्यकर्त्यांशी जोडला गेलाय. २०१९ मध्ये झालेल्या एका 'स्पायवेअर' हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी भारतातील नऊ ह्युमन राईट्स कार्यकर्ते टार्गेटवर असल्याचं यामध्ये नमूद करण्यात येतंय. धक्कादायक बाब म्हणजे या ९ कार्यकर्त्यांपैकी ८ कार्यकर्ते हे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत अशी माहिती समोर येतेय. 

समोर येणाऱ्या अहवालानुसार ह्युमन राईट्स डिफेंडर्स म्हणजेच एचआरडींना काही संशयास्पद लिंक्स पाठवल्या गेल्यात आणि या माध्यमातून त्यांना लक्ष्य करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर एक स्पायवेवर डिप्लॉय केलं जातं. या स्पायवेअरच्या माध्यमातून समोरील व्यक्ती काय बोलतेय, काय माहिती आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठवतेय, काय हालचाली करतेय याची संपूर्ण माहिती टिपली जाते. यालाच स्नूपिंग देखील म्हणतात. 

सदर ८ एचआरडी कार्यकर्ते देशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर खुली टीका करत होते. त्याचसोबत, यातील या आठ जणानीं कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या ११ कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली. याव्यतिरिक्त एकाने कोरेगाव भीमा नाही मात्र शिक्षणतज्ज्ञ जीएन साईबाबा यांच्या सुटकेची मागणी लावून धरली होती. अम्नेस्टीने जाहीर केलेल्या अहवालातील धक्कादायक बाब म्हणजे हा स्पायवेअर हल्ल्याचा धक्कादायक नमुना असल्याचं बोललं जातंय. याप्रकारे काही कार्यकर्त्यांवर वारंवार नजर ठेवली गेल्याचं म्हटलंय.   

याप्रकरणी तपास  करणाऱ्यांना अशा प्रकारचे १२ स्पिअर फिशिंग ई-मेल ओळखण्यात यश आलं. धक्कादायक बाब म्हणजे या ८ कार्यकर्त्यांपकी एकाचं नाव वापरून इतरांना इमेल्स पाठवले जाययचे. या लिंक्सवर क्लिक केल्यास किंवा या लिंक्स उघडल्या गेल्यास या स्पायवेवरच्या माध्यमातुन मोबाईल किंवा लॅपटॉपमधील खासगी माहिती थेट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जात होती . याच स्पिअर फिशिंगचा वापर करून अनेकदा अनेक प्रकारची गोपनीय माहिती किंवा संभाषणं उघड होतात. 

दरम्यान अहवालात असंही म्हटलंय की,  हा सायबर-गुन्हे हल्ला नाही पण एचआरडींच्या उपकरणांवर नियंत्रण मिळवण्याची स्पायवेअर मोहीम आहे. याचसोबत आमच्या निरीक्षणात कोणत्याही एका गटाने अशा प्रकारचा हल्ला केल्याचा निष्कर्ष देखील समोर आलेला नाही असं देखील यामध्ये म्हटलंय, दरम्यान यातील तीन कार्यकर्त्यांना मागील वर्षी NSO ग्रुपच्या पेगॅसीस स्पायवेअरद्वारे लक्ष्य करण्यात आल्याची नोंद या अहवालात आहे. 

with the help of spear phishing HRD workers related to koregaon bhima case was snooped 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com