esakal | मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण

न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. तीन सदस्यीय खंडपीठापुढे आरक्षणाची सुनावणी होईल. ही सुनावणी मान्य नसल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी होईल. आरक्षणवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येईल. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. तीन सदस्यीय खंडपीठापुढे आरक्षणाची सुनावणी होईल. ही सुनावणी मान्य नसल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीची व्यक्ती नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी मराठा आरक्षण प्रकऱणी अभ्यास करणारी राज्य सरकारच्या उपसमितीने मंगळवारी होणाऱ्या सुनावणीला विरोध दर्शवला आहे. ही सुनावणी मान्य नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. घटनापीठासमोर ही सुनावणी व्हावी अशी भूमिका राज्य सरकारची आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली त्यावेळी नागेश्वर राव आणि इतर न्यायाधीशांच्या पीठाने ही सुनावणी घेतली होती. मंगळवारी होणारी सुनावणी देखील त्यांच्याच पीठासमोर होऊ नये अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे,

हेही वाचा - नायरमधील 125 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस; चार महिने पाठपुरावा

मराठा आरक्षणात मोठ्या गुंतागूंत असल्यामुळे त्याची सुनावणी व्यापक घटनापीठापुढे व्हायला हवी असा निकाल मागील पाठाने दिला होता. त्यामुळे गेल्यावेळी उपस्थित असलेले न्यायमुर्ती वगळता व्यापक घटनापीठापुढे सुनावणी व्हावी असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे

------------------------------------------------------

loading image