esakal | कोरोना काळात महिलांमध्ये हृदयरोग व ब्रेन स्ट्रोक वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कोरोना काळात महिलांमध्ये हृदयरोग व ब्रेन स्ट्रोक वाढले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईच (Mumbai) नाही तर देशभरात हे प्रमाण वाढलं असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. परंतु, यासोबतच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये (Women) हृदयविकार जास्त वाढल्याचे अनेक निरीक्षणातून समोर आले आहे.

युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायजेशनच्या संशोधनानुसार, कामाचा ताण आणि झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोग व ब्रेन स्ट्रोक जास्त झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार कोरोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना नऊपट अधिक असून भारतामध्ये याबाबत असे संशोधन होणे गरजेचे आहे असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा: #periods: स्वच्छतेला द्या प्राधान्य; मासिक पाळीच्या काळात घ्या काळजी

हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी सांगितले की, " गेल्या दोन वर्षात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या जास्त असली तरी यामध्ये हृदयविकार झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. ऑक्सफर्ड जर्नलने नुकताच यावर अभ्यास केला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या 50 टक्के रुग्णांचे हृदय बरे झाल्यानंतर महिन्याभरानंतर डॅमेज होते. त्यामुळे, बरे झाल्यानंतरही हार्ट रेट चेक करत राहणं गरजेचं झालं आहे.

चाळिशीनंतर घरच्या जबाबदाऱ्या, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे 54 टक्के महिलांना स्थूलतेचा त्रास होतो. जवळपास 50 टक्के महिलांमध्ये मासिक ऋतुचक्र थांबल्यावर हृदयाशी संबंधित आजाराचे निदान होते. या सर्वामुळे महिलांमध्ये गेल्या दहा वर्षांत हृदयविकाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

हेही वाचा: World Heart Day 2020 - छातीत दुखणं एवढं एकच नाही हार्ट अटॅकचं लक्षण

सीव्हीडी प्रमुख कारण -

हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग म्हणजे सीव्हीडी हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा रक्ताभिसरण प्रणाली हृदय, धमन्या, शिरा आणि रक्तवाहिन्या बनलेली असते. यासंबंधित कोणत्याही समस्येला सीव्हीडी म्हणतात. अशा प्रकारे, सीव्हीडी हा हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक रोगांचा समूह आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग हा थेट फुफ्फुसावर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते.

काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी ऑक्सिजनयुक्त रक्त पम्प करण्यासाठी हृदयाच्या स्नायूंवर म्हणजेच धमन्यांवर अधिक ताण येतो. याचा थेट परिणाम हृदयाच्या पेशींवर होतो आणि ह्रदयविकार वाढीस लागतात. बीपीचे रुग्ण, डायबेटिक रुग्ण आणि स्थूल व्यक्तींमध्ये कोव्हिड-19 आजारामध्ये हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता जास्त असते.

loading image
go to top