World Heart Day 2020 - छातीत दुखणं एवढं एकच नाही हार्ट अटॅकचं लक्षण

world health day
world health day

पुणे: जगभरात दरवर्षी 29 सप्टेंबरला हृदय दिन साजरा केला जातो. ह्या दिवशी लोकांना हृदयरोगाची जाणीव करुन देणे हा मुख्य उद्देश असतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते (World Heart Federation), जगात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हृदयरोगाने होतात.

हृदयाचे काम शरीराच्या सर्व अवयवांना रक्तातून ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी पंपींग करणे आहे. ज्यावेळेस हे पंपींगचं काम कमी होत जाते तेव्हा हृदयविकार होत असतो. अशी परिस्थिती हृदय कमजोर झाल्यावर होते ज्यामुळे ते फुफ्फुसांमधून ऑक्सिजन गोळा करू शकत नाही. हृदयविकारामुळे काही आपल्या हृदयात बिघाड होत असतो. यामुळे अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. 

हृदयविकाराची लक्षणे-
1. छातीत दुखणे
2. श्वसनाचा त्रास सर्वाधिक दिसतो
3. पायऱ्या चढल्यानंतर किंवा बसून असतानाही श्वसनासाठी त्रास होत असेल
4. झोपेच्या समस्या आणि कोरडा कफ वारंवार असतील तर

हृदयविकाराचे अनेक टप्पे असतात. हृदयरोग किती जुना आहे हे त्या टप्प्यांवरून कळू शकतं. यामुळे योग्य उपचार घेण्यासही मदत होते. त्यातील काही टप्पे खालीलप्रमाणे-

टप्पा 1- यात रुग्णांना हृदयविकाराचा सौम्य झटका येण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांना कोरोनरी धमनीचा रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आणखी काही आजारही असतात.

टप्पा 2- या टप्प्यात रुग्णांना हृदयाशी संबंधित अनेक आजार दिसून येतात. काही लोकांमध्ये व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलिक डिसफंक्शन (ventricular systolic dysfunction) होतं. तर कधीकधी काही लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
 
टप्पा 3- ह्या टप्पात रुग्णांना सिस्टॉलिक डिसफंक्शन होतं आणि त्यांना विविध प्रकारची लक्षणेही जाणवतात. या टप्प्यात हृदयविकाराची सुरुवातीची काही लक्षणे दिसतात. 

टप्पा 4- रुग्णांना वैद्यकीय उपचार असूनही डिस्पेनिया आणि थकवा यासारखी लक्षणे दिसतात. हा टप्पा हृदयविकाराचा शेवटचा टप्पा मानला जातो.

हृदयाचे विकार टाळण्यासाठी काय केलं पाहिजे-
-योग्य आहार
- व्यायाम
- नियमित तपासणी-चाचण्या
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com