आजाराशी झुंज देणाऱ्या देवानंद तेलगोटेला हार्टरेटने दिला दगा

युपीएससीच्या मुलाखतीची दोनदा संधी हुकली
news
news

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) आणि त्यानंतर आलेल्या अनेक आजाराशी झुंज देत असलेल्या परभणी जिल्ह्यातील देवानंद तेलगोटे (Devananda Telgote) यांची युपीएससीने (UPSC) सर्व नियम लवचिक करत मुलाखत घेण्याचे ठरवले. त्यासाठी दिल्लीत मुलाखतीसाठी आज दुपारचा वेळ दिला होता.परंतु दिल्लीला जाण्यासाठी राजधानी ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच तेलगोटे यांच्या हार्टरेटने दगा दिला आणि आयुष्यात चालून आलेली संधी गमवावी लागली. हैदराबाद येथील रुग्णालयातून ते दिल्लीला मुलाखतीसाठी जाणार होते.सध्या तेलगो टे यांच्यावर हैदराबाद येथील के आय एम एस या रुग्णालयात उपचार घेत आहे.

युपीएससीने टेलगोटे यांची एकूणच वैद्यकीय हिस्ट्री पाहून आपला मानवी चेहरा दाखवला आणि त्याची व्हर्चुअल पद्धतीने मुलाखत घेण्याचे ठरवले, परंतु पुन्हा झालेल्या वैद्यकीय तपासणीत तेलगोटे यांची तबीयत अधिक बिघडल्याने आज पुन्हा चालून आलेली मुलाखतीची दुसरी संधीही घेता आली नाही. यामुळे मागील अनेक दिवसांपासून आजारपणात पाठबळ देणाऱ्या मित्र परिवारात याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरुवातीला आज दुपारी देवानंद तेलगोटेचा दिल्लीत इंटरव्ह्यू होता. आणि त्यासाठी काल सकाळी राजधानी ट्रेन अँब्युलन्सने दिल्लीला जाण्यासाठी तयारी चालू होती. तसे युपीएससीला कळवून तेथे व्हीलचेअर आणि इतर सुविधा पण आयोजित केली जाणार होती. परंतु ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी सायंकाळी अचानक त्याचा हार्टरेट वाढल्याने डॉक्टरांनी प्रवासास मनाई केली. त्यानंतरही युपीएससीने त्वरित मीटिंग घेऊन व्हर्चुअल इंटरव्ह्यूसाठी तयारी दाखवली. त्यासाठी तेलंगणा राज्याच्या चीफ सेक्रेटरीना मेडीकल बोर्ड व व्हर्चुअल इंटरव्ह्यूसाठी जागा सुनिश्चित करण्याचे कळविले. मात्र तेलगोटे याची तबीयत आणखी बिघडल्याने व्हर्चुअल पद्धतीने मुलाखतही होऊ शकली नाही.

news
शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत - अनंत गिते

मागील 115 दिवस रुग्णालयात ईसीएमओ आणि दरम्यान आलेला कार्डीक अरेस्ट इशुमुळे आपली तबीयत सुधारण्यासाठी देवानंद तेलगोटे यांना पुन्हा अनेक दिवस उपचार करून घ्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे देवानंद तेलगोटे यांनी आपली तबीयत बरी करून पुढील संधीसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तर तेलगोटे यांना या सर्व परिस्थितीतून उभे राहून मुळखतीपर्यंत पोचविण्यासाठी तेलंगणा राज्याच्या डीजीपी महेश भागवत यांनी मोठा पुढाकार घेतला होता. त्यांनीही आता तेलगोटे यांना पुढील संधीसाठी उभे राहण्यासाठी पुन्हा पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com