लोकहो ही बातमी नक्की वाचा आणि स्वतःची काळजी घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

नवी मुंबई : कोरड्या हवामानामुळे नवी मुंबई, पनवेल, रायगडमध्ये कमाल तापमानाचा पारा चढता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. 27) दुपारपासून पुढील 24 तासात म्हणजेच शुक्रवारी (ता. 28) उष्णतेची लाट येण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्‍यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापण नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. 

मोठी बातमी तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

गेल्या काही दिवसांपासून शहरात उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली असली तरी पाऱ्याचा आलेख 35 च्या पार गेला नव्हता. गुरुवारी सकाळी तापमान 33.63 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले; तर दुपारी मात्र 37 अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला होता. त्यामुळे दुपारी असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, उष्णतेची लाट असली तरी ती तीव्र नसल्याचा निर्वाळाही हवामान विभागाकडून देण्यात आला. साधारणतः वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्याने उष्णतेची लाट येते. या स्थितीत साधारणतः 4 अंशाने तापमानात वाढ होते. तापमान किती अंशाने वाढते, यावर या स्थितीची तीव्रता अवलंबून असते, असे सांगण्यात आले. 

मोठी बातमीमॉलमध्ये घुमली दीड वर्षीय चिन्मयची किंचाळी, आई बाबा पोहोचेपर्यंत उशीर झालेला...

सर्वसाधारण फेब्रुवारीच्या पूर्वार्धात उन्हाळ्याला सुरुवात होते. हा संक्रमण कालावधी आहे. त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे काही वेळा उष्णतेची लाट निर्माण होते. पुढेही ती अधून मधून निर्माण होण्याची शक्‍यता आहे. । - कृष्णानंद होसाळीकर, उप-महासंचालक, प्रादेशिक हवामान विभाग.

 उष्माघातापासून बचावासाठीचे उपाय 

  • जास्तीत जास्त पाणी प्यावे. 
  • सुती कपडे वापरावेत. 
  • प्रवासात पाण्याची बाटली सोबत घ्यावी. 
  • छत्री, टोपीचा वापर करावा. 
  • दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेत बाहेर जाणे टाळावे.  

heat wave to come in navi mumbai raigad take care of your health

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heat wave to come in navi mumbai raigad take care of your health