Bus Services: मुसळधार पावसाने बससेवा कोलमडली! MSRTC च्या ७,८२० फेऱ्या रद्द; २.३ कोटींचा फटका, BEST चे ९८ मार्ग बदलले!

Heavy Rain Disrupts MSRTC and BEST Bus Services Across Maharashtra : मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात MSRTC च्या ७,८२० बसफेऱ्या रद्द झाल्या, २.३ कोटींचे नुकसान झाले, तर मुंबईत BEST ने ९८ बसमार्ग बदलले.
Heavy Rain Disrupts MSRTC and BEST Bus Services Across Maharashtra

Heavy Rain Disrupts MSRTC and BEST Bus Services Across Maharashtra

esakal

Updated on

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम सोमवारीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. सततच्या पावसामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि मुंबईतील 'बेस्ट' (BEST) बस सेवेचे नियोजन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांत MSRTC ला तब्बल ७,८२० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून, त्यामुळे सुमारे २.३ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि रस्त्यांवर अडथळे निर्माण झाल्यामुळे 'बेस्ट'ने ९८ बस मार्गांमध्ये बदल केले. याशिवाय सात बसेस पूर्णपणे बंद पडल्या, तर १३५ बसेसमध्ये पावसाळ्याशी संबंधित तांत्रिक बिघाड नोंदवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com