
Rain warning for Konkan coastal districts
ESakal
ठाणे : कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यासह सर्व जिल्ह्यांतील पावसाचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थिती हाताळताना मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले आहेत.