Monsoon Update: डहाणू तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
Mumbai Rain: सकाळपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सायंकाळच्या सुमारास महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. डहाणूत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असून झाडे कोसळण्याची घटना घडली आहे.
कासा : डहाणू तालुक्यात रविवारी (ता. १५) संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळपासून अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कासा परिसरात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली.