esakal | मुसळधार पावसाचा नवी मुंबईत घरांना फटका; बेलापूर-नेरुळ परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार पावसाचा नवी मुंबईत घरांना फटका; बेलापूर-नेरुळ परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान

मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा नेरुळ भागातील घरे आणि दुकानांना मोठा फटका बसला.

मुसळधार पावसाचा नवी मुंबईत घरांना फटका; बेलापूर-नेरुळ परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान

sakal_logo
By
सुजित गायकवाड


नवी मुंबई : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा नेरुळ भागातील घरे आणि दुकानांना मोठा फटका बसला. पावसाचे पाणी साठल्याने नेरुळ परिसरातील वारणा सोसायटी, करावे गाव, बेलापूर गावातील घरांमध्ये पाणी घुसले होते. सिडको आणि कोकण भवन कार्यालयातही पाणी गेले होते. 

'कामगार कायद्यातील बदल म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'; हे तर भांडवलदारांचे सरकार, सचिन अहिर यांची टीका

बुधवारी मध्यरात्री 1 वाजल्यानंतर नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरू झाली. नेरुळ आणि बेलापूर भागात ढगांच्या गडगडाटासह अक्षरशः ढगफुटीप्रमाणे पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साठले होते. नेरुळमधील वारणा सहकारी सोसायटीत पाणी घुसल्याने नागरिकांची झोप उडाली. घरातील उपकरणे, कपडे आणि फर्निचर भिजल्यामुळे अतोनात नुकसान झाले.

रस्त्यावरील बंद असणारे मॅनहोल उघडून साठलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली. वारणा सोसायटीत पाणी घुसल्यामुळे महापालिकेने या भागातील स्वच्छ केलेल्या गटारे आणि मॅनहॉलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. करावे गावातही पाणी घुसले होते. गावातील बैठ्याचाळींमध्ये पाणी गेल्याने मध्यरात्री नागरिकांची धावपळ उडाली. पावसाच्या पाण्याने सिडको आणि कोंकण भवन इमारतींनाही सोडले नाही.

पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण 35 वरून 18 टक्के, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या निम्म्याने घटली

कोकण भवनच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी साठले होते. याच पाण्यातून सकाळी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाट काढावी लागली. सिडको भवनच्या तळमजल्यावरील जागेतही पाणी घुसले होते. सीबीडी-बेलापूर सेक्टर 4 येथील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने सामान भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.