सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांचे जबाब नोंदवले; मात्र....

sushant 1.
sushant 1.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तपास सुरू असतानाच यामागील गूढ वाढले आहे. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यापूर्वी सुशांतच्या माजी मॅनेजरसह आणखी दोन मित्रांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबतही पोलिस पडताळणी करत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहेत.  या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांचे जबाब नोंदवले असून त्यात एका अभिनेत्याचा समवेश आहे. मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावखाली असलेल्या सुशांत सिंग राजपूतने रविवारी सकाळी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलाने अनेकांना धक्का बसला. केवळ बॉलीवूडच नाही तर राजकीय नेते, खेळाडू सर्वांनीच सुशांतला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही पुढे आलेले आहे.  

अनेकांनी या मागे काही कट असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पालिकेच्या शवविच्छेन अहवालात सुशांतचा मृत्यू गळफास लावूनच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशांतवर सोमवारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर त्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलाविषयी नवनवीन तर्क वितर्क लावले जात असताना वांद्रे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांची जबाब  नोंदवले असून त्यात आत्महत्येचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसाच्या दिनक्रमानुसार सहा जणांकडून माहिती घेण्यात आली. रविवारी सकाळी सुशांत सकाळी साडेसहा वाजता उठला. 9 वाजता ज्यूस प्यायल्यानंतर त्याने साडेनऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडेदहाच्या सुमारास  सुशांत पुन्हा त्याच्या खोलीत गेला तो बाहेर आलाच नाही. सकाळी 11 च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला जेवणासाठी विचारले. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. 

12 वाजले तरी सुशांत खोलीबाहेर न आल्याने पुन्हा नोकर त्याला उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थला सांगितले. सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोन केले मात्र सुशांत फोन सुद्धा उचलत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहीण, 2 मॅनेजर, 1 कूक, चावीवाला आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलून पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजावून घेतला आहे. पण त्यात कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सुशांतची मॅनेजर दिशा तसेच इतर दोन मित्रांनी यापूर्वी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तणावाचे कारण कधी सांगितलेच नाही...
मंगळवारी पोलिसांनी सुशांतचे वडील व दोन बहिणींचे जबाब नोंदवले. सुशांत अधूनमधून मानसिक तणावाबाबत बोलायचा; मात्र त्याने नेमके कारण सांगितलेच नाही, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. त्याच्या कुटुंबीयांने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आतापर्यंत नऊ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतच्या व्यवस्थापकाचाही जबाब लवकरच नोंदवण्यात येईल. त्याच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com