तंत्रज्ञानाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा, हत्या करून नजीकच्या जंगलात पुरला होता मृतदेह

अनिश पाटील
Monday, 14 September 2020

पोलिसांनी मृत व्यक्तीचा सीडीआर काढला असता, त्यांचा शेवटचा फोन नरेंद्र माने याला करण्यात आला होता.

मुंबई : मुंबईतील नागपाडा भागात राहणा-या मनपा कर्मचा-याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा कर्मचारी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. मात्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. नरेंद्र माने आणि आकाश निगम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मृत व्यक्ती 42 वर्षाची असुन, ती नागपाडा येथे राहत होती. महानगरपलिकेत कामाला असणारी मृत व्यक्ती 26 ऑगस्टला कामावर जायचं म्हणून ते दुचाकी घेऊन निघाले. मात्र रात्री उशीरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. या काळात त्याचा मोबाईल बंद येत होता आणि ते देखील कुठेही सापडत नव्हते.

महत्त्वाची बातमी - कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी मृत व्यक्तीचा सीडीआर काढला असता, त्यांचा शेवटचा फोन नरेंद्र माने याला करण्यात आला होता. त्यानुसार, माने याचं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकेशन ट्रेस करून त्याला भिवंडीमधून ताब्यात घेण्यात आलं. यानंतर नरेंद्रची कसून चौकशी केली गेली. त्यानेच साथीदाराच्या मदतीने त्यांनी सदर इसमाची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नरेंद्र माने आणि साथीदार आकाश निकम या दोघांना अटक केली. नरेंद्र हा पश्चिम रेल्वेत नोकरीला आहे. तर आकाश हा आयकर विभागात अकाऊंटट या पदावर आहे. अनैसर्गिक संबंधांवरून नरेंद्रने आकाशला हाताशी धरत या व्यक्तीचा काटा काढण्याचा कट आखला, अशी माहिती त्याने चौकशीत दिली आहे. त्यानुसार, या व्यक्तीला भिवंडी येथे बोलावुन त्याची हत्या केली. तसेच त्याचा येथील जंगलात मृतदेह पुरुन टाकल्याची कबुली नरेंद्रने पोलिसांना दिली.

महत्त्वाची बातमी -  गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...

दरम्यान आता पोलिसानी मृतदेह ताब्यात घेत, या दोघांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले. पोलिस नरेंद्रच्या दाव्याची पडताळणी करत आहेत.

( संकलन - सुमित बागुल ) 

with the help of technology cops solved crucial case in bhiwandi read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with the help of technology cops solved crucial case in bhiwandi read full news