डबेवाले व सिने कामगारांसाठी अमेरिकी दूतावासाचा खास 'उत्सव', वाचा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

येत्या शुक्रवारी 'उत्सव' मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती अमेरिकी महावाणिज्य कार्यालयाने दिली आहे.

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले मुंबईचे डबेवाले आणि चित्रपट व्यवसायातील कामगारांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी अमेरिकेच्या महावाणिज्य दूतावासाने 'उत्सव' मोहीम हाती घेतली आहे. 

BIG NEWSठाणे महापालिका आयुक्तांचीही तडकाफडकी बदली! वाचा, नवे आयुक्त कोण आहेत ते?

मुंबईतील सुमारे 2000 डबेवाले व चित्रपट व्यवसायातील 3000 कामगारांना एक लाख किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाईल. शेफ विकास खन्ना, 'सिंटा' व हयात रीजन्सी हॉटेल यांच्या सहकार्याने हा उपक्रम रबवला जाईल. खन्ना यांनी गरजूंना अन्न देण्यासाठी एप्रिलमध्येच 'फीड इंडिया' मोहीम सुरू केली होती. त्यांनी मुंबई, वाराणसी, बंगळूरु, मंगलोर, कोलकाता आदी 135 लहानमोठ्या शहरांमधील गरजूंना दीड कोटी अन्नपाकिटे वाटली. 

BIG NEWS आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

रोज जेवणाचे डबे पोहोचवून मुंबईकरांची भूक भागवणारे डबेवाले आणि देशवासीयांचे मनोरंजन करणाऱ्या चित्रपट कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद आहे, असे अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत डेव्हिड रँझ म्हणाले. या उपक्रमात अमेरिकी दूतावास, 'सिंटा' आदींच्या सहभागाने जास्तीत जास्त गरजू लोकांना अन्न देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास खन्ना यांनी व्यक्त केला. येत्या शुक्रवारी 'उत्सव' मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती अमेरिकी महावाणिज्य कार्यालयाने दिली आहे.

help by US Embassy Assistance for Dabewale and Cine Workers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help by US Embassy Assistance for Dabewale and Cine Workers