"कोरोना'ला रोखण्यासाठी "पोलिस मित्र' मदतीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा भार थोडा हलका करण्यासाठी आता त्यांच्यासोबत पोलिस मित्रही मैदानात उतरले आहेत. तेही कोरोनाविरोधात लढण्यासाठी मोठे परिश्रम घेत असल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

भारताने उद्योगांसाठी टीनला पर्याय व्हावे...

शहरात होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. याचवेळी या पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून पोलिस मित्रही मदत करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवरील भार काहीसा हलका झाला आहे. वाढत्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची दाट शक्‍यता असतानाही जीवाची पर्वा न करता अनेक पोलिस मित्र नागरिकांना गर्दी टाळण्यासोबतच मास्क घालण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर, गरीब, गरजू, बेघर उपाशी राहू नयेत म्हणून त्यांना अन्न देण्यासाठीही ते पुढे येत आहेत. 

काळा बाजार करत असाल, तर सावधान..

संकल्पनेला यश 
शहरातील वाढती लोकसंख्या आणि पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता त्या तुलनेत सध्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. यावर तोडगा म्हणून "पोलिस मित्र' ही संकल्पना राबवून पोलिसांच्या कामामध्ये नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन आहे. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हेच पोलिस मित्र समाजाचेही मित्र होत आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping a "police friend" to stop "Corona" in Thane