
Lalbaugcha Raja Immersion
ESakal
नवसाला पावणारा राजा, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू, लालबागचा राजा यंदा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र विसर्जनाचा सोहळा सुरळीत पार पडेल या अपेक्षांना मोठा धक्का बसला. कारण राजाच्या विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून गुजरातमध्ये खास तयार केलेला हायटेक तराफा समुद्रात उतरल्यावर फुसका ठरला. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.