छपाक (Chhapaak) सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

मुंबई - दिपीकाच्या #छपाक (Chhapaak) सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास हायकोर्टने नकार दिला आहे. यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्य घटनेवर आधारित सिनेमावर कॉपिराईट कसला? असा सवाल हायकोर्टने उपस्थित केला. लेखक राकेश भारती यांनी दावा केला होता की छपाकची पटकथा माझी आहे.  ऍसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर हा सिनेमा आहे. सिनेमा प्रदर्शनला  स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली होती. ही मागणी कोर्टाने फेटाळून लावलीये. 

मोठी बातमी - 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद...

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची प्रमुख भूमिका असलेला "छपाक' चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने संबंधितांनी याचिका केली आहे, असा दावा निर्मात्या-दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा "छपाक' चित्रपट ऍसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या लढ्यावर आधारित आहे. 

मोठी बातमी - बदलत्या हवामानाचा असाही परिणाम.. 

"छपाक' चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे कोणीही स्वामित्वहक्क सांगू शकत नाही. चित्रपट निर्मात्यांची मानहानी करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे, असे मेघना गुलजार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. लेखक राकेश भारती यांनी 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली होती. 

मोठी बातमी -  वय २३ वर्ष, हेडफोन्सने घेतला जीव..

'छपाक'ची मूळ कथा "ब्लॅक डे' या नावाने नोंदणीकृत असून, त्यावर चित्रपट काढण्याबाबत अनेक निर्मात्यांशी चर्चा झाली होती. त्यांच्यात फॉक्‍स स्टार स्टुडिओचाही समावेश होता; मात्र ही चर्चा सफल झाली नव्हती. फेब्रुवारी 2015 मध्ये इम्पाकडे (इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशन) या चित्रपटाची नोंदणी केली होती, असा दावा भारती यांनी केला होता. 

high court gives not to release depika padukons chhapaak movie

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high court gives not to release depika padukons chhapaak movie