Mumbai High court
Esakal
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी पालकांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मनातील प्रश्नांची योग्य उत्तरे मिळायला हवीत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २७) दर्ज केले. पालकांनी पाच वर्षांनंतर याचिका का दाखल केली, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या राज्य सरकारला न्यायालयाने, 'या पाच वर्षांत सरकारने काय केले?' असा सवाल केला.