esakal | मेट्रो प्रकल्पाचा राडारोडा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मेट्रो प्रकल्पाचा राडारोडा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यातील (Pune) महत्त्वाकांक्षी मेट्रो (Metro) प्रकल्पाच्या कामाचा राडारोडा मुळा मुठा नदीपात्रात जमा होत असून, पर्यावरणाचे (environment) नुकसान होत आहे. त्यामुळे तो तातडीने हटविण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) दिले.

पुण्यातील वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्याचे कामही वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे मुळा मुठा नदी परिसरात खांब उभारण्यात येत आहेत; मात्र त्याचा कचरा नदीमध्ये सोडला जात असल्यामुळे प्रदूषण निर्माण होत आहे, असे सांगणारी जनहित याचिका सारणी यादवाडकर यांनी ॲड. रोनिता बॅक्टर यांच्यामार्फत केली आहे. यावर महापालिकेच्या वतीने ॲड.अभिजित कुलकर्णी यांनी खंडन केले; मात्र त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवून नदीची छायाचित्रे पाठवावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकादारांनीही नवीन फोटो पाठविले. त्यातील तफावत पाहून खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तातडीने संबंधित राडारोडा हटविण्याचे आदेश मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले.

हेही वाचा: पुणे: रिंगरोडच्या मोजणीचे काम गतीने

कंत्राटदार काम करीत असला तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे. आम्ही नदीपात्र स्वच्छ आहे की नाही याची पाहणी करायला येऊ, असे खंडपीठाने सांगितले. पुढील सुनावणीमध्ये नवीन छायाचित्रे आणि तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

loading image
go to top