
Navi Mumbai municipal corporation
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नोकर भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने बजावले आहे. नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.