Thane News: अधिकारी इतके निर्लज्ज आहेत का? ठाणे पालिकेच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाचे ताशेरे

Thane Municipal Corporation: उघड्या मॅनहोलमध्ये पडून गेल्या वर्षी एका दोन वर्षांच्या मुलाने जीव गमावला. त्या मुलाच्या कुटुंबीयांना भरपाईवर न्यायालयाने ठाणे पालिकेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
Thane municipal corporation

Thane municipal corporation

ESakal

Updated on

मुंबई : उघड्या मॅनहोलमध्ये पडून गेल्या वर्षी एका दोन वर्षांच्या मुलाने जीव गमावला. त्या मुलाच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून अवघे ७५ हजार रुपये दिले जातात, भरपाईचा हा तर्क कसा लावला, ठाणे महापालिका आणि तज्ज्ञांची समिती इतकी असंवेदनशील आहे का, अशा शब्दांत सोमवारी (ता. ६) उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेवर ताशेरे ओढले. एका चिमुकल्याने आपला जीव गमावला तरीही तुम्हाला काहीच वाटत नाही, अधिकाऱ्यांचा हुद्दा पाहा, हे अधिकारी असे असंवेदनशील निर्णय कसे घेऊ शकतात. पालिकेचे अधिकारी इतके निर्ढावलेले, निर्लज्ज आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com