FDAच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे, मंत्र्यांच्या हॉटेल्सवर कारवाई केली का? सवाल उपस्थित

Mumbai High Court: अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटवर कारवाई केली जात आहे. यावर मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्सवर कारवाई केली का, असा सवाल न्यायालयाने एफडीएला केला आहे.
Mumbai High Court On FDA Action

Mumbai High Court On FDA Action

ESakal

Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने आजवर किती मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटवर छापे टाकले, किती सरकारी आस्थापनांवर कारवाई केली, असा सवाल बुधवारी (ता. २९) उच्च न्यायालयाने उपस्थित केला. कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांवर नको. मंत्रालय, उच्च न्यायालयासह सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करा, असे आदेशही न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com