High Court Action On Mumbai Pollution
Esakal
मुंबई : वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वारंवार दिलेल्या आदेशांकडे कानाडोळा केल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २३) मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्यास दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांचे पुढील आदेश देईपर्यंत वेतन रोखण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने दिला.