Mumbai News: खवळलेल्या समुद्रात हायस्पीड बोट बुडाली, नांगरण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; गेटवे ऑफ इंडिया परिसरातील घटना

High Speed Boat Sank: गेटवे ऑफ इंडिया परिसरात खवळलेल्या समुद्रात हायस्पीड बोट बुडाल्याची घटना घडली आहे.
High Speed Boat sank in Gate way of India

High Speed Boat sank in Gate way of India

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरात नांगरून ठेवलेली हायस्पीड बोट बुधवारी सकाळी समुद्रात बुडाल्याने जलवाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती सागरी महामंडळाने दिली; मात्र समुद्र खवळलेला असताना बोट नांगरण्यासाठी कोणते निकष लागू होते, संबंधित बोट अशा परिस्थितीत समुद्रात उभी करण्यास सक्षम होती का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com