राज्यात उद्रेक ! कोरोनाबाधितांचा उच्चांंक, दिवसभरात रुग्णसंख्या 2 हजार पार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

63 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 38,  पुण्यात 9,  औरंगाबाद शहरात 6, सोलापूर शहरामध्ये  3, रायगडमध्ये 3, आणि ठाणे जिल्ह्यात 1, पनवेल शहरात 1,सलातूर मध्ये 1, तसेच अमरावती शहरात 1  मृत्यू झाला आहे. 

मुंबई : रविवारी राज्यात 2347 नवीन रुग्णांची उच्चांंकी नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33,053 झाली आहे. राज्यात 63 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून हा देखील एका दिवसातील मोठा आकडा आहे. यामुळे मृतांचा आकडा 1198 झाला आहे. आज 600  रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत एकूण 7688 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील  रुग्णांची संख्या 33,053 झाली असली तरी त्यातील 24,161 ऍक्टीव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

राज्यात 63 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 38,  पुण्यात 9,  औरंगाबाद शहरात 6, सोलापूर शहरामध्ये  3, रायगडमध्ये 3, आणि ठाणे जिल्ह्यात 1, पनवेल शहरात 1,सलातूर मध्ये 1, तसेच अमरावती शहरात 1  मृत्यू झाला आहे. 
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 44  पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 34  रुग्ण आहेत तर 22 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 63 रुग्णांपैकी 41 जणांमध्ये ( 65 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

हे ही वाचा : एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1198 झाली आहे. 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1688 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14,972 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 63.83  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

हे वाचलत का : वानखेडे स्टेडियम क्वारंटाईन सेंटर होणार नाही ? .संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर..

7688 रुग्णांना बरे करण्यात यश
आजपर्यंत राज्यातून 7688 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 3,48,508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17,638 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

The highest number of corona patients in maharashtra, the number of corona patients exceeded 2 thousand in a day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest number of corona patients in maharashtra, the number of corona patients exceeded 2 thousand in a day