esakal | कोरोना संकटातील ऐतिहासिक अधिवेशन! दोन दिवसांची केवळ औपचारिकता
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संकटातील ऐतिहासिक अधिवेशन! दोन दिवसांची केवळ औपचारिकता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्या (ता. 7) ला सुरू होत आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी विरूध्द विरोधक असा संघर्ष पाहता येणार नाही. 

कोरोना संकटातील ऐतिहासिक अधिवेशन! दोन दिवसांची केवळ औपचारिकता

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्या (ता. 7) ला सुरू होत आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी विरूध्द विरोधक असा संघर्ष पाहता येणार नाही. 

5 विधेयके
अधिवेशनात 9 अध्यादेश, नवी 5 विधेयके सादर केली जातील. भू-संपादन करताना उचित भरपाई देण्याचे विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक, मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे विधेयक, वेश्मी मालकी सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सुधारणा विधेयक या विधेयकांचा त्यात समावश आहे. तसेच वर्ष 2020-21चे पुरवणी मागण्यांचे विनियोजन विधेयक असेल.

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता

विरोधकांची अडचण  
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे अध्यक्षांच्या आसनासमोरील रिकाम्या जागेत विरोधी पक्षाला घोषणा देता येणार नाहीत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनही करता येणार नाही. तारांकीत प्रश्न, लक्षवेधी सारखी आयुधं विरोधकांना वापरता येणार नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांची संधी हुकणार आहे.

विरोधकांची रणनिती
दोन दिवसाचे अधिवेशन आहे. या काळात आम्ही सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढू. बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, कोरोना उपाययोजनातील त्रुटी, बंद पडलेले उद्योगधंदे, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर आमचा भर असेल, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.  

अपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

विरोधकात शांतता 
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहापान ठेवले नाही. कोरोनाच्या धास्तीने सरकार जसे शांत आहे, तसेच विरोधी पक्षातही सामसूम आहे. आज विरोधक भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली नाही. विरोधकांची पत्रपरिषद न होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. 

---------------------------------------- 

( संपादन- तुषार सोनवणे)