Mumbai Airport: दिवाळीत मुंबई विमानतळावर घडला इतिहास; तब्बल १ हजार विमांनांची ये- जा

मुंबई विमानतळावर दिवाळीत विमान प्रवासांची गर्दी वाढली
Mumbai Airport Authority
Mumbai Airport Authorityesakal

दिवाळीच्या हंगामात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबई विमातळावरून ५ लाख १६ हजार ५६२ प्रवासी विमान प्रवास केला आहे.

तसेच मुंबई विमानतळावरुन शनिवार ११, नोव्हेंबर २०२३ रोजी तब्बल १ हजार ३२ विमानांची ये-जा झाली. जी ९ डिसेंबर २०१८ रोजी मुंबई विमानतळावरुन एक हजार ४ विमानांची वाहतूक झाली होती.

Mumbai Airport Authority
Mumbai Airport : मंगळवारी सहा तासांसाठी मुंबई विमानतळ बंद असणार; 'हे' आहे कारण...

देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे, तसेच दिवाळी हंगाम्यात बाहेर गावी जाणाऱ्या आणि पर्यटक स्थळी भेट देणाऱ्यांची संख्या वाढत जाते, या काळात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. तसेच प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने यंदाचा हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

Mumbai Airport Authority
Mumbai Airport : मंगळवारी सहा तासांसाठी मुंबई विमानतळ बंद असणार; 'हे' आहे कारण...

मुंबई विमातळाने २९ ऑक्टोबर पासून ते ३० मार्च २०२४ पर्यत हिवाळी वेळापत्रक लागू केले आहे. त्यानुसार .गेल्या वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात ८ टक्के उड्डाणाची संख्या वाढली आहे. ११ नोव्हेंबर, १२ नोव्हेंबर आणि १३ नोव्हेंबर या तीन दिवसात पाच लाख १६ हजार ५६२ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला. त्यात देशांतर्गत मार्गावर सर्वाधिक तीन लाख ५४ हजार ५४१ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १ लाख ६२ हजार २१ प्रवाशांनी प्रवास केला. या तीन दिवसात देशांतर्गत दोन हजार १३७ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर ७५७ विमानांची वाहतूक झाली.

देशांतर्गत प्रवासासाठी दिल्ली,बंगळुरु आणि चैन्नईकरिता तर आंतरराष्ट्रीय मार्गावर दुबई, लंडन, अबुधाबी आणि सिंगापूरला जाणार्‍या प्रवाशांची गर्दी होती. शनिवारी एक लाख ६१ हजार ४१९ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला.त्यात देशांतर्गत मार्गावर एक लाख ७ हजार ७६५ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर ५३ हजार ६८० प्रवाशांचा समावेश आहे.

Mumbai Airport Authority
Hamburg Airport: जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीचा गोळीबार, सर्व उड्डाणे रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com