
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची चांगलीच चर्चा आहे. केवळ राजकाीय गाठीभेटींमुळेच नव्हे तर आणखी एका गोष्टीची सध्या चर्चा होत आहे. अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी एका अँम्ब्युलन्सला रस्त्यावर रोखून धरण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amit Shah Mumbai Visit)
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी या विषयाकडे लक्ष वेधलं आहे. त्यांनी ट्वीट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये गोखले म्हणतात की, असं काही मुंबईत होईल अशी कल्पनाही तुम्ही केली नसेल. अमित शाह (Amit Shah) यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाता यावं, म्हणून अँम्ब्युलन्सला अडवून धरण्यात आलं. अमित शाह यांनी झेडप्लस सुरक्षा आहे. म्हणजे ते व्हीआयपी आहेत व्हीव्हीआयपी नाहीत. तरीही पहिल्यांदाच त्यांच्यासाठी मुंबईतले रस्ते बंद करण्यात आले. भाजपा सत्तेत आल्यापासून हे होत आहे.
अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केलेल्या कठोर टीकेवरून त्यांची चांगलीच चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.