कंगनासाठी हिमाचलमधल्या गुंडांची स्टंटबाजी, थेट गृहमंत्र्यांना ९ वेळा धमकीचे फोन

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

कंगनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन येऊ लागलेत. गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून काही गुंड सतत फोन करुन धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या वक्तव्याचे सध्या पडसाद उमटत आहेत. मुंबई तसंच मुंबई पोलिसांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन येऊ लागलेत. गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून काही गुंड सतत फोन करुन धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

'कंगना राणावत से दूर रहो...ये बात समझ लो...तुमने गलत किया अभी भी संभल जाओ नही तो...' अशा आशयाचे धमकीचे फोन गृहमंत्र्यांना आलेत. असे ७ फोन आल्याचं समजतंय. तर आज सकाळी म्हणजेच ९ सप्टेंबरला दोन वेळा धमकीचे फोन आले. धमकीचे हे फोन हिमाचल प्रदेशमधून आलेत.  हे फोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन येत आहेत. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचाः  छोटू चायवाला मुंबई सोडण्याच्या मार्गावर; 26/11 हल्ल्यातील योद्ध्यावर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट

कंगनाविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव

मंगळवारी विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने २०१६ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. 

अधिक वाचाः  आज कंगना मुंबईत येतेय! येण्यापूर्वी अभिनेत्रीचा सूर मवाळ, केलेल्या ट्विटची चर्चा

कंगनाची चौकशी करणार 

कंगना ड्रग्स घेते असे आरोप अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी एका मुलाखतीत केलं होतं. त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचीही चौकशी आम्ही करणार असल्याचंअनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं.

Home Minister Anil Deshmukh Receive Threatened Call For Kangana Himachal Pradesh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh Receive Threatened Call For Kangana Himachal Pradesh