सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीबाबत गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

sushant singh rajput
sushant singh rajput

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. सुशांतला नैराश्यानं ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र त्याच्या आत्महत्येने काही प्रश्नही उपस्थित केलेत. काहींनी सुशांतच्या आत्महत्येचं मुळं कारण हे बॉलिवूडमधील घराणेशाही हे असल्याचा आरोप केला आहे. यामुळेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्या संबंधित मुंबई पोलिस चौकशी करतील असं सांगितलं आहे.

खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? की काही कारणांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केली का? याची चौकशी केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी सिनेसृष्टीतील व्यावसायिक स्पर्धेमुळे जाऊन त्याने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस त्यादृष्टीनेदेखील चौकशी करतील, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट देखील केलंय.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अचानक अशा जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या अनेकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ तिनं बॉलिवूडमध्ये प्रस्थापितांचं असलेलं वर्चस्व सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला.

कुटुंबियांसह सहा जणांचे जबाब नोंदवले 

वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या बहिणीसह सहा जणांचे जबाब नोंदवून घेतलेत. गरज पडल्यास सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदविला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. सुशांतसोबत राहणारे दोन मॅनेजर, एक स्वयंपाकी, सुशांतची खोली उघडण्यासाठी आणलेला चावीवाला, सुशांतची बहीण आणि त्याचा मित्र अभिनेता महेश शेट्टी या सर्वांचे जबाब पोलिसांनी सोमवारी नोंदवले. 

आत्महत्येच्या आधी सुशांतने शेवटचा फोन शेट्टी याला केला होता. मात्र त्याने तो उचलला नाही. झोपलो असल्याने फोन उचलता आला नाही. मी आणि सुशांत चांगले मित्र होतो. मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला पण त्याने उचलला नाही, असे शेट्टी याने आपल्या जबाबात सांगितले. सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील आणि कुटुंबीय मुंबईत दाखल झाले. त्यावेळी पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी कुटुंबियांना या आत्महत्याबाबत तक्रार करायची आहे का? अशी विचारणा केली. त्यावर कुटुंबियांनी सुशांतवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सांगतो, असं म्हटलं.  त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटलंय.

home Minister gives big information about Sushant's suicide inquiry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com