कोरोना रुग्णांच्या ICU खाटासांठी वशिलेबाजी? सर्वेतून समोर आली धक्कादायक माहिती

कोरोना रुग्णांच्या ICU खाटासांठी वशिलेबाजी? सर्वेतून समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : देशात कोविड संसर्ग झपाट्याने पसरत चाललाय, कोरोना रुग्णांच्या संख्येने 55 लाखाचा टप्पा पार केलाय. या अभुतपुर्व  परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. अनेक गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू  खाटा मिळत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक रुग्ण दगावले आहेत. देशातील ही परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकल सर्कल’ने केला. या सर्व्हेतून कोरोना रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

78 टक्के लोकांना रुग्णासाठी आयसीयू खाटा मिळवण्यासाठी वशीलेबाजीचा आधार घेतला. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करुन आयसीयूत प्रवेश मिळवला आहे.

 केवळ 4 टक्के रुग्णांना नियमीत प्रक्रीयेतून रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे.

तर 4 टक्के रुग्णांना शेवटपर्यंत खाटा मिळाल्याच नाही. अस या सर्व्हेतून समोर आलंय.

लोकल सर्कलने देशातील 211 जिल्हांमध्ये 17 हजार पेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला. यातून अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. गंभीर कोरोना रुग्णांना आयसीयू खाटा सहजासहजी मिळत नाही. 78 टक्के व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांना आयसीयूमध्ये दाखल करुन घेण्यासाठी आपले संबध  आणि प्रभावाचा वापर करावा लागला आहे. तर 7 टक्के  गंभीर रुग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी खूप खटाटोप करावा लागला आहे. 7 टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कुठल्या तरी स्वरुपाची लाच द्यावी लागली आहे. सामान्य प्रक्रियेतून केवळ 4 टक्के लोकांना आयसीयू खाटा उपलब्ध झाल्यात. तर 4 टक्के गंभीर रुग्णांना निकराचे प्रयत्न करुनही शेवटपर्यंत आयसीयू बेड मिळाले नाही. अशी माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. 
  
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्रशासनाने रुग्णालयातील आयसीयू खाटांच्या माहिती देण्यासाठी ऍप्स तयार केले. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्षात संबधीत रुग्णालयाला फोन केल्यानंतर आयसीयूमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले आहे. दिल्लीमध्ये हे प्रमाण जास्त आहे. 

खाटाच्या उपलब्धेतबद्दल पारदर्शकता : 

रुग्णालयांनी उपलब्ध खाटासंदर्भात पारदर्शकता ठेवण्यासाठी काय करायला हवं, याबद्दलही या सर्व्हेमध्ये विचारले गेले. त्यामध्ये 92 टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी रुग्णालयांना आपल्या वेबसाईटवर  खाटांची परिस्थिती, माहिती वेळोवेळी अपडेट्स करणे बंधनकारक करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बोर्डवर उपलब्ध खाटांविषयी माहिती द्यायला पाहीजे अस अनेकांनी सुचवलं आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे असूनही आपल्या ओळखीच्या जोरावर अनेकांनी आयसीयू खाटा अडवून धरल्याच्या तक्रारी केल्या आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य आरोग्य विभागाने मिळून यासंबधीची कठोर नियमावली करण्याची आवश्यकता असल्याचही  या सर्वेमध्ये भाग घेतलेल्या अनेकांनी सल्ला दिला आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

horrible report regarding corona and availablity of ICU beds read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com