esakal | तळीये ग्रामस्थांना घरांमध्ये हवेत बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तळीये ग्रामस्थांना घरांमध्ये हवेत बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रायगड (Raigad) जिल्ह्यातील तळीये (Taliye) गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील बरे उद्ध्वस्त झाली. यात मोठी जीवित व वित्त हानी झाली. या दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना म्हाडामार्फत (Mhada) घरे उभारून देण्यात येणार आहेत.

या घरांच्या प्रतिकृती म्हाडा कार्यालयात उभारल्या गेल्या आहेत. घरांची पाहणी तळीये ग्रामस्थांनी केली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी घराच्या रचनेत काही बदल सुचविले आहेत. गावच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तळीयेला भेट दिली होती.

हेही वाचा: पहिल्या टप्प्यात साठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार - राधाकृष्ण गमे

यादरम्यान गावातील प्रमुख व्यक्तींना म्हाडा कार्यालयात उभारलेली घरे पाहण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार सरपंच, आमपंचायत सदस्यांनी प्रतिकृतींची पाहणी करत घराच्या रचनेत काही बदल सुचविले.. गावातील प्रमुख व्यक्तींनी प्रतिकृतीची पाहणी केली आहे. त्यांनी "" काही बदल सुचविले आहेत. गावातील सर्व व्यक्तींना घराचा आराखडा दाखवून आवश्यक ते बदल सुचवावेत, अशी विनंती ग्रामस्थांना केली. - नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ

loading image
go to top