मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार लवकर निघून गेलेत, यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात...

सुमित बागुल
Wednesday, 12 August 2020

जितेंद्र आव्हाड यांना एका मराठी वृत्तवाहिनीने अजित पवार आज मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर निघून गेलेत, असाही प्रश्न विचारला गेला.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुरवातीलाच आव्हाड यांना सरकारबद्दल विचारणा करण्यात आली. यावर आवाहद यांनी नारायण राणेंवर टीका केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड म्हणालेत की, मला माहित नाही राणे पत्रिका पाहतात, हात पाहतात का त्यांना काही ज्ञान प्राप्त आहे, हे मला माहित नसल्याचं म्हणालेत आव्हाड म्हणालेत. 

मोठी बातमी - शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"

अजित पवार बैठकीतून लवकर गेलेत, काय सांगाल ?

जितेंद्र आव्हाड यांना एका मराठी वृत्तवाहिनीने अजित पवार आज मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर निघून गेलेत, असाही प्रश्न विचारला गेला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. कोविडचा प्रश्न आहे, सगळं संपत आलंय, कोविडचे शेवटचे दोन प्रश्न उरले होते, त्यांना कदाचित पुण्याला जायचं असेल म्हणून ते लवकर गेलेत. तीन तास अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीत बसलेत, हे तुम्ही पाहिलं नाही आणि ते दहा मिनिटं आधी गेलेत त्याच्या तुम्ही बातम्या केल्यात, असं आव्हाड म्हणालेत.   

मोठी बातमी  - समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

म्हाडाच्या बाबतीत मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय : 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत म्हाडाच्या बाबतीत मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. कधी मालक, कधी टेन्ट्स, NOC घेऊन डेव्हलपमेंट थांबून राहणं, प्रकल्प पुढे ढकलला जाणे असे  प्रकार समोर येतात. आजच्या निर्णयाने अशा बाबींमध्ये अडकून पडलेल्या १४ हजार सेस बिल्डींग्सबाबत आता काम मार्गी लागेल. आता या गोष्टी सरकारने हातात घेतल्या आहेत. यानंतर आता डेव्हलपमेंट होऊ शकणार आहे.  

housing minister jitendra awhad on ajit pawar leaving early from cabinet meeting


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: housing minister jitendra awhad on ajit pawar leaving early from cabinet meeting