esakal | बेकायदेशीर प्रवेश कसे होतात ? मनविसेने विचारला जाब !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बेकायदेशीर प्रवेश कसे होतात ? मनविसेने विचारला जाब !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अकरावी ऑनलाइन (Online) प्रवेश प्रक्रियेच्या आडून मुंबईतील (Mumbai) अनेक महाविद्यालयांत सुरू असलेल्या कोट्यातील बेकायदेशीर प्रवेशांविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) (MNS) आक्रमक भूमिका घेत शिक्षण उपसंचालकांना भेटून बेकायदेशीर प्रवेश कसे होतात, याचा जाब विचारला.

हेही वाचा: मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला अटक; महाराष्ट्र ATSची कारवाई


बेकायदेशीर प्रवेशासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात मनविसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा मनसे सचिव सुधाकर तांबोळी यांनी दिला. यावेळी उपसंचालक संदीप संगवे यांनी आम्ही केलेल्या तक्रारींवर लवकरच संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे मनसे सचिव सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.

loading image
go to top