esakal | राजकीय व्यक्ती चार्टर विमानातून दिल्लीत जाऊन रेमडेसिव्हीर कसे आणू शकते ? - हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

राजकीय व्यक्ती चार्टर विमानातून दिल्लीत जाऊन रेमडेसिव्हीर कसे आणू शकते ? - हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजावारा उडालेला आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे. कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात जागा मिळत नाहीय. रुग्ण तासन तास रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत आहेत. ऑक्सिजन अभावी तिथेच त्यांचा मृत्यू होतोय. एकंदर राज्यात आरोग्य आणी-बाणीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती गिरीश कुलकर्णी यांनी स्व:हून दाखल करुन घेतलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली.

अहमदनगरचे खासदार सुजय विखे-पाटील हे अलीकडेच खासगी विमानाने दिल्लीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा घेऊन आले. दिल्लीत कोरोनामुळे चिंताजनक स्थिती असताना, राजकीय व्यक्ती चार्टर विमानातून दिल्लीत जाऊन रेमिडीसीवीर कसे आणू शकते असा सवालही हायकोर्टाने विचारलाय.सा सवाल न्यायालयाने विचारला आहे.

हेही वाचा: 'व्यक्तीश: मत आज जाहीर करण्यापेक्षा'...अजित पवार म्हणाले...

खासगी व्यक्तीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन कशी मिळू शकतात? यापुढे खासगी व्यक्तींना अशा प्रकारे इंजेक्शन दिली, तर कारवाई करु असा इशारा हायकोर्टाने दिला आहे.

loading image