सेफ्टी किटशिवाय सफाई कामगारांची सुरक्षा कशी ? न्यायालयाचा महापालिकेला सवाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोनाचा धोका वाढत असताना आणि लॉकडाऊन सुरू असतानाही सफाई कामगार, कचरा वेचक कामावर हजर आहेत. त्यांना पीपीई किट पुरवणे बंधनकारक आहे.

मुंबई : नवी मुंबईतील हजारो सफाई कामगार कोरोनाचा संसर्ग सुरू असताना सेफ्टी किटशिवाय काम कसे करतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे.

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

कोरोनाचा धोका वाढत असताना आणि लॉकडाऊन सुरू असतानाही सफाई कामगार, कचरा वेचक कामावर हजर आहेत. त्यांना पीपीई किट पुरवणे बंधनकारक आहे. सेफ्टी किटशिवाय ते कसे काम करणार, अशी विचारणा न्या. एस. जे. काथावाला यांनी केली. नवी मुंबई क्षेत्रातील सफाई कामगार संघटने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. सेफ्टी किटमध्ये एन-95 मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदी साधनांचा अंतर्भाव असतो. या सेफ्टी किटच्या खरेदीचा तपशील आणि वापराची मुदत याबाबत लेखी माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले नवी मुंबई महापालिकेला दिले. 

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

कोरोनाची बाधा
नवी मुंबई महापालिकेने सुरक्षा साधने दिलेली नसतानाही हजारो कर्मचारी सफाईचे काम करत आहेत. आतापर्यंत काही जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 24 हून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते, असे याचिकादारांनी नमूद केले आहे.

How to protect cleaner worker without safety kits? read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to protect cleaner worker without safety kits? read full story