esakal | कोरोनाच्या काळात खाद्यपदार्थांना 'असं' ठेवा सुरक्षित; जाणून घ्या महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

vegitables

कोरोना व्हायरसचा धोका मानवी शरीराला आहे तसाच तो खाद्यपदार्थांनाही आहे. मात्र हे बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ घरी कसे स्वच्छ करून घ्यायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

कोरोनाच्या काळात खाद्यपदार्थांना 'असं' ठेवा सुरक्षित; जाणून घ्या महत्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तब्बल एक लाखाच्या पार पोहोचला आहे. त्यात कोरोना व्हायरस आता स्वतःमध्ये जेनेटिक बदल आणून अधिक प्रभावी होत चालला आहे. कोरोना व्हायरसचा धोका मानवी शरीराला आहे तसाच तो खाद्य पदार्थांनाही आहे. मात्र हे बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ घरी कसे स्वच्छ करून घ्यायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

बाहेरून खाद्यपदार्थ किंवा फळं-भाजी खरेदी करून आणल्यानंतर त्यात कोरोना व्हायरस तर नाही ना याबद्दल आपल्या मनात नेमहीच शंका येते. त्यामुळे आपण हे खाद्यपदार्थ धुवून घेतो किंवा स्वच्छ करून घेतो. मात्र ते तुम्ही योग्य पद्धतीनं स्वच्छ करणं महत्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच्या काही टिप्स देणार आहोत. 

हेही वाचा: आदित्य ठाकरे झळकतायेत सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांवर.. सॅनिटरी नॅपकिन्सवरून शिवसेनेची जाहिरातबाजी.. 

वापर करण्याच्या ४ तास आधी खाद्यपदार्थ बाहेर ठेवा: 

  • बाहेरुन आणलेली फळं किंवा भाज्या यांना कमीत कमी ३-४ तास बाहेर ठेवा.
  • त्यानंतर त्यांना स्वच्छ गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. 
  • या खाद्यपदार्थांना तुम्ही बेकिंग सोडा असलेल्या पाण्यातही धुवून घेऊ शकता. 
  • पोटॅशिअम परमॅंगनेटचा एक थेंब पाण्यात घालून ठेवा. 
  • त्यानंतर या पाण्यानं फळं आणि भाज्या धुवून घ्या. 
  • फळं आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी सॅनेटाईझरचा वापर करू नका. 

केळी किंवा कांद्यांना असं करा स्वच्छ: 

केळी किंवा कांदे यांना आपण स्वच्छ धुवून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना खाण्याच्या आधी २-३ तास पिशवीच्या बाहेर काढून ठेवा. तसंच शक्य असेल तर त्यांना गरम असलेल्या जागी ठेवा. 

चेकमेट ! म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'

पनीर आणि दुधाच्या पिशवीला असं करा स्वच्छ: 

  • पनीर किंवा दुधाच्या पिशवीला मास्क लावून साबणाच्या पाण्यानं धुवून घ्या.  
  • प्लॅस्टिकच्या बाटलीवर व्हायरस २४ तास राहू शकतो त्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीत दूध आणू नका. 

औषधांच्या पाकिटाला हात लावण्याआधी २-३ बतास बाहेर ठेवा आणि त्यांनतर एका डब्यात ठेवा. तसंच स्टेशनरीच्या वस्तूंना सॅनेटाईझ न करता त्यांनाही ३-४ तास बाहेर ठेवा आणि त्यांनतर वापर करा. कुरिअरच्या सामानालाही ४ तास बाहेर उन्हात ठेवा ज्यामुळे संपूर्ण व्हायरस नष्ट होऊ शकेल. 

how to sanitize fruits and vegitables at home read full story