esakal | निम्म्या खर्चात स्वच्छता कशी होणार ; कॉंग्रेसचा प्रश्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

निम्म्या खर्चात स्वच्छता कशी होणार ; कॉंग्रेसचा प्रश्‍न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्मशाणभुमी,दफनभुमीची स्वच्छता निम्म्या खर्चात कशी होणार असा थेट प्रश्‍न आज कॉंग्रेसने महानगर पालिकेच्या स्थायी समितीत उपस्थीत केला.मात्र,हाऊसकिंपींगचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.यावर कॉंग्रेसने सभात्याग केला.

महापालिका प्रशासनाने ५० स्मशाणभुमी आणि दफनभुमींच्या नियमीत स्वच्छतेसाठी हाऊस किंपींग कंपनी नेमण्याचा निर्णय घेतला होता.त्यात मागवलेल्या निवीदांमध्ये पात्र कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित दरा पेक्षा ४६ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली होती.हा प्रस्ताव स्थायी समितीत चर्चेसाठी आल्यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्यावर आक्षेप घेतला.यापुर्वी उद्यान मैदानांच्या देखभालीचा प्रस्ताव कमी खर्चाचा होता.तेव्हा तो रद्द करण्यात आला.आता हा प्रस्तावरही रद्द करावा.निम्म्या खर्चात कामाचा दर्जा कसा राखला जाणार असा प्रश्‍न त्यांनी उपस्थीत केला.मात्र,हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्यावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला असे रवी राजा यांनी सांगितले.

हेही वाचा: रेल्वेस्थानकात फलाटावरून ट्रॅक्‍टर घसरला अन्‌.... 

काय आहे प्रकरण
महापालिकेने दैनंदिन साफ सफाईसाठी प्रत्येक चौरस फुटाला १ रुपया ६९ पैशांचा दर निश्‍चित करुन निवीदा मागवल्या होत्या.मात्र,पात्र कंत्राटदाराने हे काम पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ४६ टक्के कमी किंमतीत करण्याची तयारी दाखवली आहे.

loading image
go to top