Dombivali Fraud : सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक

सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली.
Nursing Course
Nursing CourseSakal

डोंबिवली - सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलीस तपास सुरू केला आहे.

उडान इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे विश्वकर्मा सिटी ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेकडील झुंजारराव संकुलात हे इन्स्टिट्यूट होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पैसे वाया घालवणाऱ्या या संस्थाचालका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या इन्स्टिट्यूट मध्ये सरकार मान्य असलेल्या नर्सिंग कोर्स करून देतो या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केलीये. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेले सर्टिफिकेट बनावट असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी शिवसेना शहर शाखेशी संपर्क साधला. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. दरम्यान सरकारमान्य कोर्स नावाने बनवट सर्टिफिकेट देत लाखो रुपये उकळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणाऱ्या या इन्स्टिट्यूट विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com