पैशांच्या चणचणीमुळे बांधकाम मजुरांची उपासमार, प्रशासनाचे दुर्लक्ष

construstion labour
construstion labour
Updated on

वाडा : संचारबंदीमुळे कुडूस येथील शिवाजी नगर परिसरातील परप्रांतीय बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभरापासून गेल्या काम नसल्याने पैसे नाहीत त्यामुळे सुमारे 60 मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ही त्यांनी केली आहे. 

वाडा तालुक्यातील कुडूस हे उद्योगाचे केंद्रस्थान असून या परिसरात अनेक कारखाने आहेत. त्यामुळे कामासाठी परप्रांतीय बांधकाम कामगारही गेल्या अनेक वर्षांपासून येथे आपल्या कुटुंबासह राहत आहेत. दरम्यान कुडूस ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील 437 मजुर कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना अन्नधान्य मिळावे असा पत्रव्यवहार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे 16 एप्रिल रोजी केला आहे. मात्र संबंधित प्रशासनाने मोफत धान्य या कामगारांना अद्यापही न दिल्याने या 60 कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कामगार जय गोविंद प्रसाद यांनी सांगितले. सध्या या सर्वांची जेवणाची सोय उपसरपंच डाॅ. गिरीश चौधरी यांनी केली आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊनलवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. -उध्दव कदम,
तहसीलदार, वाडा.

 Hunger of construction workers due to shortage of money, neglect of administration

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com