डोंबिवली : भर रस्त्यात पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

घरगुती वादातून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघालेल्या पत्नीवर भर दुपारी रस्त्यावरच पतीने धारदार चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी घडली.
Knief Attack
Knief AttackSakal
Summary

घरगुती वादातून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघालेल्या पत्नीवर भर दुपारी रस्त्यावरच पतीने धारदार चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी घडली.

डोंबिवली - घरगुती वादातून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघालेल्या पत्नीवर (Wife) भर दुपारी रस्त्यावरच पतीने धारदार चाकूने वार (Knief Attack) केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात वंदना देवकर (वय 38) या गंभीर जखमी (Injured) झाल्या, घटनेचे गांर्भिय राखत रिक्षाचालकाने तत्काळ रिक्षा शास्त्रीनगर रुग्णालयात वळविली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी पती सोमनाथ देवकर याच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. वंदना या गंभीर जखमी असून त्यांना कळवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेत दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वंदना यांचा सोमनाथ यांच्याशी 8 वर्षापूर्वी विवाह झाला आहे. सोमनाथ हे वंदना यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते त्यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला यामध्ये सोमनाथ यांनी त्यांना मारहाण केल्याने त्या रागाच्या भरात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निघाल्या.

Knief Attack
काँग्रेसचे भाजपविरोधात 'माफी मांगो' आंदोलन; नाना पटोलेंची घोषणा

दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळून त्यांनी रिक्षा पकडली. ऐवढ्यात पाठीमागून चाकू घेऊन आलेल्या सोमनाथ यांनी त्यांच्या गळ्यावर, हातावर, पायावर चाकूने वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत वंदना यांना घेऊन त्वरीत रिक्षा शास्त्रीनगर रुग्णालयात हलविली, तसेच रामनगर पोलिसांनाही याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वंदना यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

चारीत्र्याच्या संशयावरुन सोमनाथ व वंदना यांच्यात सकाळी वाद झाला. या वादातूनच सोमनाथ यांनी वंदना यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे. सदर महिलेस उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून पुढे त्यांना इतरत्र हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पती सोमनाथ यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा तपास घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सांडभोर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com