जेवणात मटणाचे तुकडे कमी दिले म्हणून तिला जीवंत जाळलं, पुढे... 

जेवणात मटणाचे तुकडे कमी दिले म्हणून तिला जीवंत जाळलं, पुढे... 

हल्ली कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. अगदी कुणाच्या खुनचं देखील  काहीही कारण असू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडलीये.  पत्नीने जेवणात मटणाचे तुकडे कमी दिल्याच्या रागातून एका व्यसनी पतीने, आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकुन तिला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना कामोठे येथे उघडकीस आली आहे.

मनोहर सरोदे असं या 35 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून 4 डिसेंबर रोजी त्याने आपल्या पत्नीला जाळून पलायन केले आहे. कामोठे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव पल्लवी सरोदे (30) असे असुन ती पती मनोहर आणि मुलांसह कामोठे येथे रहाण्यास होती.

मटणाचे तुकडे कमी दिल्याने सुरु केली मारहाण 

मनोहर हा बिगारी काम करुत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो नेहमी रात्री दारु पिऊन आल्यानंतर पल्लवीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे मनोहर हा दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने विकत घेतलेले मटण पल्लवीला देऊन तीला कालवण बनविण्यासाठी सांगितले. काही वेळातच पल्लवीने मटणाचे कालवण बनविल्यानंतर ते तीने मनोहरला जेवण्यासाठी दिले.

मात्र पल्लवीने त्याच्या जेवणामध्ये मटणाचे तुकडे कमी दिल्याचे व जेवण बनविण्यास उशीर झाल्याचे कारण सांगत पल्लवीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणातच त्याने पल्लवीच्या अंगावर रॉकेल टाकून तीला जाळून त्याठिकाणावरुन पलायन केले. यावेळी पल्लवीने आरडा-ओरड केल्यानंतर शेजाऱयांनी पल्लवीला लागलेली आग विझवून तीला तत्काळ उपचारासाठी मुंबईतील सायन येथील रुग्णालयात दाखल केले.

पल्लवीचा उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान पतीने जाळल्यामुळे 45 टक्के भाजलेल्या पल्लवीचा अखेर उपचारादरम्यान 11 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर सायन पोलिसांनी या प्रकरणातील मृत पल्लवीचा पती मनोहर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा कामोठे पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार कामोठे पोलिसांकडून फरार मनोहरचा शोध घेण्यात येत आहे.मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

जेवणात मटणाचे तुकडे कमी दिल्याच्या रागातून पत्नीला जीवंत जाळणाऱया पतीचा शोध आता सुरु आहे. 

Webtitle : husband torched his wife for not serving extra mutton pieces in dinner 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com