पनवेल : विवाहितेला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न; पतीला अटक

crime
crimesakal media

पनवेल : घटस्फोट देण्यास नकार (Divorce case) देणाऱ्या विवाहितेला, पती व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. त्यानंतर तिला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रकार घडला आहे. सदर विवाहितेला उपचारार्थ एमजीएम रुग्णालयामध्ये (MGM hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी (Panvel Police) विवाहितेच्या (culprit arrested) पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

crime
१५ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाची सिनेट; चहापानावर सदस्यांचा बहिष्कार

तक्रारदार विवाहिता (वय ३५) असे असून ती पनवेल तालुक्यातील हेदुटणे गावात पती व दोन मुलांसह राहते. तिचा पती शिवचरण जल्ला याचा ट्रान्स्पोर्ट व कुरीयरचा व्यवसाय असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नीला मिळाली होती. त्यामुळे मागील महिन्याभरापासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते. याच कारणावरून नवऱ्याने घटस्फोट मागण्यास सुरुवात केली होती. मात्र ती घटस्फोट देण्यास नकार देत होती.

मंगळवारी रात्री शिवचरण घरामध्ये असताना त्याचे वडील, मावशी व नणंद, त्यांचे पती हे त्यांच्या घरी आले. यावेळी त्यांनी शिवचरणला घटस्फोट देण्यास विवाहितेला बजावले. मात्र तिने नकार दिल्याने त्यांच्यामध्ये भांडण झाले. यानंतर शिवचरण याने तिला जबरदस्तीने फिनेल पाजले, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले. यानंतर तिला बेशुद्धावस्थेत तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. विवाहितेची तब्येत सुधारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com